मुंबई : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार?

विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीयांकडून करण्यात येत आहे. 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप उमेदवार देणार, शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी एका जागेवर आपला उमेदवार उभा करणार, तर अकरावा उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील अर्ज भरणार आहेत. दरम्यान, 11 जागांसाठी अकराच उमेदवार रिंगणार उतरणार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तरी, विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola