मुंबई : मराठी अभिमान गीतावरुन मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांच्यात शाब्दिक जुगलबंदी
राज्यपालांच्या अभिभाषण अनुवादावरुन झालेला वाद ताजा असतानाच मराठी अभिमान गीतावरुनही विधानसभेतही गोंधळ पाहायला मिळाला. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात मराठी अभिमान गीतातलं सातवं कडवं गाळण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. लाभले आम्हास भाग्य... या गीतातील सातवं कडवं गाळण्यामागे नेमका काय हेतू आहे? असा सवाल करत अजित पवारांनी सरकारनं माफी मागावी अशी मागणी केली. यानंतर विरोधकांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणा केल्या. यावेळी सरकारनं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी गोंधळ घातल्यानं सभागृहाचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं.