मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळीच जातप्रमाणपत्र सादर करावं लागणार
बारावीचा निकालानंतर राज्यात अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. मात्र यंदा विद्यार्थी आणि पालकासमोर एक नवीन पेच प्रसंग निर्माण झाला आहे. कारण यंदाच्या वर्षापासून प्रवेशावेळी जात प्रमाणपत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पण हा निर्णय अचानक माहित झाल्याचं पालक आणि विद्यार्थ्यांचं म्हणण आहे.