मुंबई : विधानपरिषद निवडणूक : दीपक सावंतांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेत फेरविचार
विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार निवडणुकीसाठी दीपक सावंत यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत शिवसेनेत फेरविचार सुरु आहे. विभागप्रमुख आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांनी दीपक सावंत यांच्याबाबत मातोश्रीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्य मंत्री पदी असताना ही दीपक सावंत यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्यासाठी शिवसेनेत मोर्चेबांधणी सुरु असल्याचं कळतं. दीपक सावंत यांना डावलल्यास सुभाष देसाईंकडे आरोग्य मंत्री पद जाण्याची शक्यता आहे.