रायगड: उरण - जेएनपीटी बंदरावर फळं-भाज्यांचे शेकडो कंटेनर अडकले
केंद्र सरकारनं नव्याने लागू केलेल्या डीपीडी अर्थात डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी धोरणाविरोधात वाहतूकदार आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जेएनपीटी बंदरावर मोठ्या प्रमाणावर फळं आणि भाजीपाल्याचे कंटेनर अडकून पडले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून वाहतूकदारांनी असहकार आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे आयात-निर्यातीवर परिणाम होऊन कंटेनर बंदर परिसरातच पडून आहेत. याचा फटका आंबा, द्राक्ष आणि इतर शेतमालाला बसत आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या डीपीडी धोरणामुळे आयात कंटेनर पोर्टमधून कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये न जाता थेट गोदामामध्ये जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदार आणि इतर छोट्या-मोठ्या व्यावसायिक कामगारांना मोठा फटका बसणार आहे.