मुंबई : सिनेट निवडणुकीत युवासेनेचं वर्चस्व, १० पैकी ८ जागांवर विजय
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेनं एक हाती विजय मिळवत भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केला आहे. आतापर्यंत 10 जागांपैकी 8 जागांवर युवासेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. तर उर्वरित दोन जागांवर देखील युवासेनेचेच उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे दहाही जागांवर युवासेनेचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement