मुंबई विद्यापीठाच्या कायद्याच्या परीक्षा दोन महिने लांबणीवर
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाच्या कायद्याच्या परीक्षांचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलं. लॉच्या परीक्षा तब्बल 2 महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आधीच्या परीक्षेचे निकाल 90 दिवसानंतरही लागलेले नाहीत. त्यामुळे पुनर्मुल्य़ांकनासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे मुंबई विद्यापिठाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेंच महाविद्यालयांकडे सोपवाव्या अशी मागणी करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेनं यासाठी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी शिक्षण मंत्र्यानी चर्चेत सकारात्मकता दाखवत, लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं.
Continues below advertisement