मुंबई विद्यापीठाचे राखीव निकाल अखेर जाहीर
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाचे राखीव निकाल लागणार लागणार म्हणता म्हणता अखेर जाहीर झाले. प्रथम सत्र 2017 च्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल मुंबई विद्यापीठानं 19 सप्टेंबर 2017 पर्यंत जाहीर केले. मात्र यामध्ये काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. आज 2 हजार 300 राखीव विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठानं जाहीर केलेत. विद्यापीठाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध करून देण्यात आलेत.
Continues below advertisement