मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरं, देशातल्या टॉप 100 मध्येही नाव नाही

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज एनआयआरएफची (National Institutional Ranking Framework) यादी जाहीर केली. देशातील टॉप विद्यापीठं, कॉलेज, इन्स्टिट्युट इत्यादी यादी जाहीर करण्यात आली. देशपातळीवरील विद्यापीठांच्या यादीत गेल्या वर्षभरापासून आपल्या भोंगळ कारभारामुळे चर्चेत राहिलेल्या मुंबई विद्यापीठाचं नाव पहिल्या 100 मध्येही नाही.

शिक्षणाचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या यादीत नववं स्थान मिळवलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola