मुंबई : विद्यापीठाच्या वसतीगृहातील एकमेव मेस अचानक बंद
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु बदलले तरी समस्या मात्र संपायचं नाव घेत नाहीयेत. विद्यापीठात असलेल्या एकमेव वसतिगृहाच्या दुरावस्थेची बातमी माझाने दाखवल्यानंतर प्रशासनानाने तातडीने पावलं उचलत दुरुस्तीचे काम सुरु केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था ही करण्यात आली. मात्र आता विद्यार्थ्यांसाठी असलेली एकमेव मेस देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.