मुंबई: 4 स्थळांना युनेस्कोच्या वारसा पुरस्कारांमध्ये समावेश
Continues below advertisement
युनेस्कोचा सांस्कृतिक वारसा पुरस्कार मुंबईतील 'द रॉयल ओपेरा हाऊसला' मिळालाय. ही वास्तू 1916 साली ब्रिटीशकालीन राजवटीत बांधण्यात आलेली आहे. त्यावेळी वास्तूत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. 1990च्या दशकात बंद ठेवण्यात आलेली ही वास्तू 2008 साली डागडुजीसाठी खुली करण्यात आली. या वास्तुचे सध्याचे काम आबाजी लांबा या वास्तुविशारदाने केले आहे. त्यांना युनेस्कोतर्फे गुणवत्ता पुरस्कार घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.
Continues below advertisement