Under-19 Asia Cup | अथर्व अंकोलेकरचं मुंबईत विजयी मिरवणूक | ABP Majha
Continues below advertisement
सातव्यांदा आशिया चषक जिंकलेल्या भारती अंडर नाईन्टिन क्रिकेट संघाचं मुंबईत आगमन झालं. रविवारी कोलंबोत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा अवघ्या पाच धावांनी पराभव केला आणि आशिया चषकातलं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. अंतिम सामन्यात 28 धावांत पाच विकेट्स घेणारा मुंबईचा अथर्व अंकोलेकर भारताच्या या यशाचा शिल्पकार ठरला. त्यामुळे मुंबईत दाखल झाल्यानंतर अंधेरीतल्या त्याच्या घरापर्यंत त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आली. अथर्वची आई बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून सेवेत आहे. कंडक्टरच्या या मुलाने अंडर नाईन्टिन आशिया चषकात चार सामन्यात तब्बल 12 विकेट्स घेऊन भारताच्या विजयात मोलाचं योगदान बजावलं.
Continues below advertisement