मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच, उद्धव ठाकरेंचा निर्धार
Continues below advertisement
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनादिन सोहळ्यात केला. जे आव्हान देण्यासाठी समोर आहेत, त्यांच्या छाताडावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवून दाखवेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, विधानसभा, लोकसभेत भगवा फडकवण्याआधी जनतेच्या मनात भगवा रुजवा, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले.
उद्धव ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुनही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सीमेवर अनेक सैनिकांचे बळी जावे लागले, तेव्हा भाजपला उपरती झाली का? दहशतवादाला रंग नसतो, तर मग रमजानला शस्त्रसंधी का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी पीडीपीशी युती तोडल्यानंतर भाजपचं अभिनंदन करायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.