53th Shivsena Foundation Day | शिवसेना आणि भाजपात सगळं समसमान पाहिजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण | ABP Majha
भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दावा केला जात असतानाच शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. या दोन्ही नेत्यांनी आपआपल्या भाषणात सूचक विधानं केली. आपल्या भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी हे विधान केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पण त्यांचा अप्रत्यक्ष इशारा सत्तेतल्या समसमान वाट्याकडे आहे, हे उपस्थित कार्यकर्त्यांना कळायला वेळ लागला नाही. एका युतीची पुढची गोष्ट महाराष्ट्राच्या व्यासपीठावर असून संपूर्ण देश बघतोय असेही उद्धव ठाकरे म्हणाले.