मुंबई : उद्धव ठाकरे आणि तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यात फोनवरुन चर्चा?
Continues below advertisement
स्वबळाच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंनी आता एनडीएविरोधात मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत का, अशी चर्चा रंगू लागली आहे. कारण, टाईम्सनी दिलेल्या वृत्तानुसार उद्धव ठाकरेंनी काल तेलगू देसमचे नेते चंद्रबाबू नायडू यांच्याशी फोनवरुन बातचित केली. या दोघांमध्ये एनडीएची साथ सोडण्याबरोबरच आगामी निवडणुकात एकत्रितपणे कसं आव्हान देता येईल., यावर चर्चा झाल्याचं कळतं आहे. एनडीएत शिवसेनेपाठोपाठ तेलगू देसम पक्षाचीही खदखद काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरुन झालेली बातचित महत्वपूर्ण मानली जाते आहे.
Continues below advertisement