मुंबई : आम्हाला राजकारण शिकवू नका, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

Continues below advertisement
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनादिन सोहळ्यात केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुनही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सीमेवर अनेक सैनिकांचे बळी जावे लागले, तेव्हा भाजपला उपरती झाली का.  दहशतवादाला रंग नसतो, तर मग रमजानला शस्त्रसंधी का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी पीडीपीशी युती तोडल्यानंतर भाजपचं अभिनंदन करायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. या वेळी त्यांनी मोदींवर खास ठाकरी शैलीत टीका केलीय गेली ४ वर्षे मोदींना जनतेला थापा मारल्या.. आता मोदी थापा मारण्यासाठी थेट मंगळावरही जातील, असा टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर पगडीवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुनही उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram