मुंबई : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा विरोध कायम
Continues below advertisement
नाणार प्रकरणी पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उद्याच्या भेटीचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेटाळलाय... विश्वासात न घेता नाणारचे परस्पर करार करता मग भेट कशाला मागता असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली.,. शिवाय नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होऊच देणार नाही असं म्हणत विरोध कायम ठेवलाय...काल दिल्लीमध्ये पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २ कंपन्यांसोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यावर शिवसेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान आज नाणार प्रकल्पावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी झाली... नाणार प्रकल्पाबाबत झालेल्या कराराविषयी विश्वासात घेतलं नसल्याची तक्रारही त्यांनी केली. दरम्यान उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य़ांनी सेना मंत्र्य़ांना दिलं आहे.