VIDEO | मराठा मोर्चाचे सदस्य उद्धव ठाकरेंच्या भेटीला, दिलेला शब्द पाळणार, उद्धव ठाकरेंचं आश्वासन | ABP Majha

मराठा आंदोलनादरम्यान तरूणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना भवनात झालेल्या या भेटीदरम्यान कोपर्डी घटनेतील पीडित मुलीचे आई-वडील देखील उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चा आणि आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या तरूणांच्या घरातील एकाला एसटी महामंडळात नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याची लवकरात लवकर पूर्तता करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram