मुंबई | राष्ट्रवादीचं ऑफिस कुठे माहित नाही, उदयनराजेंची बैठकीनंतर एन्ट्री
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीवादीतर्फे मतदारसंघनिहाय आढावा बैठक होत आहे. या बैठकीला पोहचण्यास साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांना विलंब झाला. राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ताच माहित नसल्यामुळे साताऱ्याची बैठक संपल्यानंतर उदयनराजे पोहचले. मात्र ट्राफिकमुळे आपल्याला उशीर झाल्याचं उदयनराजे म्हणाले. उदयनराजे यांचे समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आधीच पोहचले. मात्र उदयनराजेंना ऑफिस कुटे आहे, हेच माहित नसल्यामुळे त्यांना पत्ता शोधण्यात वेळ गेला. कार्यकर्ते उदयनराजेंना फोनवरुन मार्गदर्शक करत होते. कुठल्या सिग्नलला कुठे वळावं, याविषयी कार्यकर्त्यांकडून सूचना दिल्या जात होत्या. बैठकीत एका गटाने उदयनराजे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली, तर दुसऱ्या गटाने उदयनराजेंना विरोध केला. रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.