मुंबई : विद्यापीठात एलएलएमच्या सेमिस्टर एक आणि दोनचा पेपर एकाचवेळी
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात पुन्हा एकदा त्रुटी समोर आल्या आहेत. यंदा मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया उशिरा पार पडली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा सेमिस्टर वनच्या परीक्षेचा अभ्यास झाला नव्हता. हायकोर्टाच्या निर्णयानुसार अशा विद्यार्थ्यांना मे महिन्यात सेमिस्टर वन आणि टूची परीक्षा सोबत देण्याची मुभा मिळाली होती. मात्र आताच्या वेळापत्रकानुसार 23 मे रोजी एकाच वेळी सेमिस्टर वन आणि सेमिस्टर टूचे वेगवेगळे पेपर आल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.
Continues below advertisement