मुंबई : अंगावर झाड कोसळून मुंबईत एकाचा मृत्यू, चार जण जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
झाड कोसळून मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ एम.जी. रोड येथे झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. यातील एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
मेट्रो सिनेमाजवळ एम.जी. रोड येथे आझाद मैदानाला लागून असलेलं झाड संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास कोसळलं. या दुर्घटनेत एकूण पाच जण जखमी झाले होते. यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर सध्या एक जण गंभीर आहे.
दरम्यान, मुंबईत झाड कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही दादरमध्ये झाड कोसळून पाच जण जखमी झाले होते. तर दहीसरमध्ये 14 वर्षीय मुलीचा अंगावर झाड पडून मृत्यू झाला होता. शिवाय अनेक गाड्यांचं नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.