नालासोपाऱ्यात पाण्यातून भरधाव रेल्वे नेल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर कारवाई

Continues below advertisement
ट्रॅकवर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून ट्रेन नेल्याप्रकरणी विरार स्टेशन मास्तर आणि इतर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याची माहिती एक्स्प्रेसच्या लोको पायलटला न सांगितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 20 सप्टेंबरला मुंबईत झालेल्या जोरदार पावसानं नालासोपारा स्टेशनवरील ट्रॅकवर गुडघाभर पाणी साचलं होतं. त्याचवेळी एक एक्स्प्रेस सुसाट वेगानं त्या ट्रॅकवरून गेली. मात्र ट्रॅकवर पाणी साचलेलं असताना ट्रेन नेणं प्रवाशांच्या जीवाशी धोका असतो. अशा परिस्थितीतही स्टेशन मास्टरनं लोको पायलटला कोणतीही सूचना न केल्यानं शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram