मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सुरु, मात्र ट्रेन उशिराने
Continues below advertisement
जवळपास तीन तासांच्या खोळंब्यानंतर हार्बर मार्गावरील लोकल रेल्वेची वाहतूक सुरु झाली आहे. शिवडी स्थानकाजवळ तुटलेलं ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यात आल्यानंतर वडाळा ते सीएसएमटी लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र लोकल सध्या उशिराने धावत आहेत. लवकरच लोकल सेवा पूर्वपदावर आणण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
Continues below advertisement