Farmer Loan Waiver | राज्यात लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, राज्य सरकारची तयारी | ABP Majha
Continues below advertisement
राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकार हे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्याजिल्ह्यातून मागविण्यात आली आहे. मार्च 2016 -17 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करून मोठा दिलासा देण्याची सरकारचे प्रयत्न असणार आहेत. शिवाय अन्य कारणांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री राज्यभरात विकास यात्रा काढून जनतेशी संवादही साधणार आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील ४३ लाख ३५ हजार शेतकºयांना १८ हजार २३५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.
Continues below advertisement