मुंबई: मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकीचं पत्र

Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देणारी दोन पत्रं मंत्रालयात आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागानं सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.
गडचिरोली जिल्ह्यात एप्रिलमध्ये पोलिसांच्या कारवाईत मोठ्या संख्येनं नक्षलवादी मारले गेले होते. त्यानंतर आलेल्या धमक्यांच्या दोन पत्रांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, त्यांचे कुटुंबीय आणि गडचिरोलीतील कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाईल आणि आम्ही त्या घटनेचा बदला घेऊ, अशी पत्रं आली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram