मुंबई : अभिनेत्री आयेशा टाकियाला जीवे मारण्याची धमकी
Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकियाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आयेशाचे पती फरहान आझमी यांनी मुंबई पोलिसांकडे ट्विटरवरुन तक्रार केली आहे. 'माझी पत्नी आयेशा, आई आणि बहीण यांना एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असून त्यांचा पाठलागही केला जात आहे. पोलिसांकडे तक्रार करुनही डीसीपी दहिया यांनी दुर्लक्ष केलं. माझे कॉल, मेसेज यांना ते उत्तर देत नाहीत. दहियांनी आमची बँक खाती गोठवली आहेत. नरेंद्र मोदी, सुषमा स्वराजजी कृपया लक्ष द्या' असं ट्वीट फरहान आझमी यांनी केलं आहे.
Continues below advertisement