मुंबई : गणेशोत्सवात थर्माकॉलवरील बंदी हायकोर्टाकडून कायम
Continues below advertisement
गणेशोत्सवासाठी तुम्ही थर्माकोलचे मखर घ्यायला जाणार असाल तर थांबा, कराण थर्माकोलच्या मखरांवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. थर्माकोल फॅबरिकेशन आणि डेकोरेटर असोसिएशची याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. थर्माकोलबंदी लागू करण्याआधी मालाची विल्हेवाट लावण्यासाठी पूरेसा अवधी दिला होता, तसंच पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा कोणत्याही गोष्टींना परवानगी देता येणार नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. थर्माकोलवर बंदी घातल्यानं डेकोरेटर्स आणि कलाकारांचं मोठं नुकसान होणार आहे, त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवसाठी तरी परवानगी द्या, अशी विनंती करणारी याचिका थर्माकोल फॅबरिकेशन आणि डेकोरेटर असोसिएशननं कोर्टात दाखल केली होती.
Continues below advertisement