मुंबई | ठाणे, मुलुंड, पवई, अंधेरी, वरळीत सकाळी जोरदार पाऊस
मुंबईतल्या मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, पवई, अंधेरी, जोगेश्वरी या भागांमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय... जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पवईजवळ रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्र आहे... काल नाशकातही पाऊस झाला... मात्र मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.