मुंबई : तब्बल 20 वर्षानंतर खगोलप्रेमींना खग्रास चंद्र ग्रहण पाहण्याची संधी
तब्बल 20 वर्षानंतर आज खगोलप्रेमींना खग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे. यावेळी चंद्र आणि पृथ्वीमध्ये सर्वात कमी अंतर असल्याने चंद्राचा आकार इतर वेळेपेक्षा सर्वात जास्त दिसेल. याचसोबत ही महिन्यातील दुसरी पौर्णिमा असल्याने ब्लू मूनही असणार आहे. दरम्यान यावेळी खगोप्रेमींना आकाशात चंद्र लाल दिसणार आहे. त्यामुळे आजची घटना डोळ्यांनी पाहणे म्हणजे खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी असणार आहे.