मुंबई : ठाकरे घराण्यातील आणखी एक व्यक्ती राजकारणाच्या आखाड्यात?
Continues below advertisement
आदित्य ठाकरेंपाठोपाठ ठाकरे घराण्यातली आणखी एक व्यक्ती राजकारणात येते की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण, तेजस ठाकरे यांचा फोटो सामना या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतरच्या अभिनंदनाच्या जाहिरातीत त्यांचा फोटो छापला गेलाय. त्यामुळे या फोटोबरोरच आता तेजस ठाकरेही राजकारणात झळकतील का, अशा चर्चा होत आहेत.
Continues below advertisement