मुंबईची जेमिमा रॉड्रिग्स भारताच्या अ संघात

Continues below advertisement
मुंबईची सतरा वर्षांची उदयोन्मुख फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सचा भारतीय महिलांच्या अ संघात समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशचा महिला संघ तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येत आहे. या मालिकेसाठीच्या भारत अ संघात जेमिमा रॉड्रिक्सची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या वन डे सामन्यांच्या अंडर नाईन्टिन लीगमध्ये खेळताना जेमिमानं नुकतंच एक शतक आणि एक द्विशतक ठोकलं होतं. याच कामगिरीने तिला भारतीय महिलांच्या अ संघाची दारं खुली झाली आहेत.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram