Mumbai Indians | मुंबई इंडियन्सच्या फौजेचं जंगी सेलिब्रेशन | मुंबई | ABP Majha
आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सच्या फौजेचं आज संध्याकाळी मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबई इंडियन्सच्या विजयीवीरांची ओपन डेक बसमधून निघालेली चॅम्पियन्स परेड हे या सेलिब्रेशनचं मोठं आकर्षण ठरलं. पेडर रोडवरच्या अॅण्टिलिया इमारतीमधून निघालेल्या चॅम्पियन्स परेडची मरीन ड्राईव्हच्या हॉटेल ट्रायडण्टमध्ये सांगता झाली. या मिरवणुकीत पुणेरी ढोलपथकानं केलेला दणदणाट चाहत्यांचा उत्साह आणखी उंचावणारा ठरला.