मुंबई : रतन टाटांच्या स्वप्नातील नॅनो कार बंद होण्याची शक्यता
Continues below advertisement
देशातील मध्यमवर्गीयांना हक्काच्या गाडीचे मालक बनण्याचे स्वप्न दाखवत रतन टाटा यांनी बाजारात आणलेली टाटा नॅनो अखेरच्या घटका मोजत आहे. जून महिन्यामध्ये टाटा कंपनीने केवळ एकाच नॅनो कारचे उत्पादन केल्याने टाटाकडून नॅनो कारचे उत्पादन बंद करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र टाटा नॅनोचे उत्पादन बंद करण्याचा अद्याप निर्णय झाला नसल्याचे टाटा कंपनीने स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement