मुंबई: IPS शिवदीप लांडेंची धडक कारवाई, बारमधील गुहेचा शोध
अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी मुंबईतील एका डान्सबारवर धाड टाकून, बारमालकांची अनोखी शक्कल उघडी पाडली.
बारबाला लपवण्यासाठी बारमालकांनी शौचालयात बनवलेली गुहा शिवदीप लांडे यांनी शोधून काढली.
काल मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड चित्रपटगृहाजवळील कल्पना बारमध्ये पोलिसांनी छापा टाकला.
या बारमध्ये बारबाला लपवण्यासाठी शौचालयात गुहा तयार करण्यात आली होती. ही गुहा शिवदीप लांडे यांच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्यांनी शौचालयातील गुहेची पोलखोल केली.
पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्याकरिता बारबालांना या गुहेत लपवले जाते होते. या कारवाईत 12 बारबाला, बारमधील 9 जणांसह 18 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.