मुंबई : मनसेने नाणार प्रकल्पासाठी काम करणारं ताडदेवमधलं कार्यालय फोडलं
Continues below advertisement
राज्यात आणि कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, हे स्पष्ट केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते या प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कामगार सेनेने मुंबईतील ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं.
ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडवर मनसैनिकांनी हल्ला चढवला.
नाणारचा प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलं. रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.
मुंबईतील मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने 100 महिलांना रोजगाराचं साधन म्हणून रिक्षांचं वाटप करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी हा इशारा दिला होता.