बिटकॉईन घोटाळ्यात आता सनी लिओनी, नेहा धुपियाची चौकशी?
बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानंतर आता अनेक सेलिब्रिटीही अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. अभिनेत्री सनी लिओनी, नेहा धुपिया, झरीन खान, सोनल चौहान, हुमा कुरेशी यांच्यासह अनेकांनी बीटकॉईनचं प्रमोशन केल्याचा दावा केला जात आहे.
जवळपास 2 हजार कोटींच्या या घोटाळ्यात, ईडीने राज कुंद्रा यांना समन्स बजावलं होतं. राज कुंद्रांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 तास चौकशी केली.
बिटकॉईन व्यवहारातील बेहिशेबी संपत्ती प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी राज कुंद्रा यांना प्रश्न विचारले.