मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी अनंतात विलीन, प्रसिद्ध गायक सुदेश भोसलेंकडून आठवणींना उजाळा

Continues below advertisement
बॉलिवूडची पहिली सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संध्याकाळी 5 वाजून 13 मिनिटांनी पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीत श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीदेवींच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी संजय कपूर, अनिल कपूर, अर्जुन कपूर, सोनम कपूर, मुली जान्हवी आणि खुशी हे कुटुंबीय उपस्थित होते. त्याशिवाय अमिताभ बच्चन, लारा दत्ता, विद्या बालन, अनुपम खेर, अर्जुन रामपाल यासारखे सेलिब्रिटीही उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी श्रीदेवींना श्रद्धांजली देत आठवणींना उजाळाही दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram