मुंबई : धोबीघाटावरील अतिक्रमण पालिकेने हटवलं, शिवसेनेचा पालिकेविरुद्ध ठिय्या
Continues below advertisement
सव्वाशे वर्षे जुन्या असलेल्या धोबीघाटावरची अतिक्रमणे मुंबई महापालिकेनं हटवली, मात्र पालिकेच्या या कारवाईविरोधात शिवसेनेच्याच नेत्यांनी जी साऊथ वॉर्डमध्ये ठिय्या आंदोलन केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध महापालिका असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
महापालिकेने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई केली होती. यावेळी धोबीघाटावरील पायवाटांवरची अतिक्रमणं काढण्यात आली होती. त्याचप्रमाणे पाच ठिकाणी उभारण्यात आलेले अनधिकृत शेडही तोडण्यात आले होते.
वर्षानुवर्षे धोबीघाटावर काम करणाऱ्या व्यक्तींचे जुने पुरावे ग्राह्य धरले गेले नाहीत, असं स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेचं म्हणणं आहे. आमदार सुनिल शिंदे, नगरसेवक आशिष चेंबुरकर, किशोरी पेडणेकर या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.