मुंबई : शाळेतून आता छडीची शिक्षा हद्दपार होणार, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे आदेश
Continues below advertisement
'छडी लागे छम छम विद्या येई घम घम' असं म्हंटलं जायचं. शिक्षकाच्या हातात छडी पाहिली तरीही विद्यार्थी घाबरतात. मात्र आता शाळेतून ही छडीची शिक्षा बंद होणार आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने याबाबत आदेश जारी केला आहे. शिक्षण बाल हक्क कायद्यानुसार कोणत्याही मुलाला शारीरिक किंवा मानसिक छळाला सोमोरे जाऊ नये अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता राष्ट्रीय बालहक्क आयोगाने शाळांमध्ये छडीची शिक्षा वगळण्याबाबत निर्णय घेतला.
Continues below advertisement