राज्यातील शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. याविरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संयज निरुपम यांच्या नेतृत्वात चर्चगेट स्थानकाच्या बाहेर थालीनाद आंदोलन करण्यात आलं..यावेळी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर पुण्यात बैलगाड्यांवर दुचाकीवाहनं नेऊन अनोख्या पद्धतीने इंधन दरवाढीचा विरोध करण्यात आला. तिकडे कोल्हापुरच्या जिल्ह्याधिकाऱी कार्यालयावर बैलगाडी आणि सायकल मोर्चा काढण्यात आला. बुलेटला बैलगाडीत ठेवून इंधन दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आलाय.
Continues below advertisement