Air India | एअर इंडियाची इमारत राज्य सरकार खरेदी करणार | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतल्या नरिमन पॉईंटवरील एअर इंडियाची 23 मजली इमारत राज्य सरकार खरेदी करणाच्या विचारात आहे. त्यासाठी 1400 कोटी रुपयांची बोली राज्य सरकारच्या वतीनं लावण्यात आलीय. एलआयसी आणि जेएनपीटीपेक्षा जास्त बोली लावल्यानं राज्य सरकारला या आयकॉनिक इमारतीचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनाचे सर्व विभाग एकाच इमारतीत आणण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. अधिक पारदर्शकता आणि गतिमान कारभारासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Continues below advertisement