मुंबई: प्रवेश नाकारणाऱ्या मुंबईतील ११ खाजगी शाळांना नोटीस
Continues below advertisement
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या मुंबईतील ११ खाजगी शाळांना शिक्षण नियंत्रण विभागानं नोटीसा पाठवल्य़ा आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले तर अशा शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल असं शिक्षण निरीक्षकांकडून सांगण्यात आलं आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खाजगी शाळांमध्य़े आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखून ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला टाळाटाळ करत आहेत. काही वर्षांपासून शासनाकडून परतावा शुल्क येत नसल्याचं कारण या शाळांनी पुढं केलं होतं.
Continues below advertisement