मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, धर्मा पाटलांच्या जमिनीबद्दल अहवाल येण्याची शक्यता
Continues below advertisement
मुंबईत आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत धुळे जिल्ह्यातील विखऱणचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या जमिनीप्रकरणाचा अहवाल येण्याची शक्यता आहे. धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल देणं अपेक्षित आहे. मागील आठवड्याच्या बैठकीत तसे आदेश देण्यात आले होते. विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांनी जमिनीसाठी कमी मोबदला मिळाल्यामुळे मंत्रालयात विष प्राशन केलं त्यानंतर 29 जानेवारी रोजी धर्मा पाटील यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आता तरी योग्य मोबदला मिळणार का हा प्रश्नच आहे.
Continues below advertisement