एसटी संप : पगारवाढ रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा दुर्दैवी : जयप्रकाश छाजेड
Continues below advertisement
सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. हा संप मोडित काढण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. कर्मचाऱ्यांनी संप थांबवला नाही, तर पगारवाढ रद्द करु अशी धमकी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिली आहे. पगारवाढ करुनही संप सुरु असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र पगारवाढ रद्द करण्याचा प्रशासनाने दिलेला इशारा दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया 'इंटक'चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement