मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, अखेर लालपरी रस्त्यावर
मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदा ठरवल्यानंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून आगारात उभी असलेली लालपरी आज रस्त्यावर धावत आहे. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी हा संप मागे घेत असल्याचं परिपत्रक एसटी संघटनेने प्रसिद्ध केलं.