मुंबई : डिझेल दरवाढीमुळे एसटी प्रवास महागण्याची शक्यता
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळं आता एसटी प्रवास महागण्याची चिन्हं आहेत. तिकीटवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळ घेण्याच्या तयारीत आहे. मागील वर्षी डिझेलचा सरासरी दर 58 रुपये लिटर होता. तो आता 68 रुपयांहून अधिक झाला आहे. यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि महामार्गांवरील वाढते टोलचे दर यामुळे तोट्यात वाढ होत आहे. हेच पाहता ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. डिझेल दरवाढीमुळे 460 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार एसटीवर पडणार आहे.