मुंबई: दहावीच्या पेपर फुटीप्रकरणी खासगी क्लासचे दोन शिक्षक ताब्यात
Continues below advertisement
दहावी विज्ञान पेपर फुटी प्रकरणात मुंबईत दोन खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकांना अटक करण्यात आलीय. साकीनाका येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांकडे विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरु होण्याआधी शिक्षकांना मोबाईलमध्ये सापडली. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी मुलाकडून दोन स्थानिक खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षकांची नावे समोर आली. पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलंय. फिरोज अन्सारी आणि मुज्जमिल काझी अशी क्लास घेणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत.
Continues below advertisement