मुंबई : सात वर्ष बिनपगारी, विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचं आंदोलन
विशेष विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करणाऱ्या राज्यातले 1300 शिक्षक मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. मागच्या सात वर्षांपासून पगार मिळाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिक्षकांचं रिक्त जागांवर समायोजन व्हावं, नियमानुसार वेतनश्रेणी लागू करावी अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत