प्रेयसीच्या आत्महत्येला जबाबदार ठरवलेल्या पोलिसपुत्राचा गळफास

Continues below advertisement
मुंबईत हेड कॉन्स्टेबलच्या 25 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकावर कॉन्स्टेबल असलेल्या प्रेयसीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तरुणाच्या गर्लफ्रेण्डने नोव्हेंबर महिन्यात आपलं आयुष्य संपवलं होतं.

रविवारी सकाळी राहत्या घरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मुंबईतल्या परेल भागातील पोलिस हेडकॉर्टर्समध्ये राहत होता. एका खाजगी कंपनीत तो नोकरी करत होता. 'मुंबई मिरर' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram