Smriti Irani | स्मृती इराणी 14 किलोमीटर अनवाणी चालत सिद्धिविनायकाचरणी लीन | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी सोमवारी रात्री 14 किलोमीटर अनवाणी चालत जाऊन दादरच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एकता कपूर देखील होत्या. एकता कपूर यांनी याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयात पोस्ट केला आहे. याच बरोबर सिद्धिविनायक मंदिरातील दर्शनाचे फोटो ही टाकण्यात आले आहेत.तसेच दर्शन झाल्यावर देखील कार मधून जातानाच व्हिडीओ टाकण्यात आला आहे. यात आमचा नवस पूर्ण झाला असे त्या म्हणत आहेत. तसेच दुसऱ्या व्हिडीओत स्मृती इराणी या चालत अनवाणी आल्याचे आश्चर्य एकता कपूर व्यक्त केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram